‘चकव्या’च्या जाळ्यात अडकल्यानेच काँग्रेस आघाडीचा झाला इस्कोट! आ.अब्दुल सत्तारांचे आता मुंबई-हैदराबाद कनेक्शन?

Foto
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना शह देण्याच्या नादात काँग्रेस आघाडीने जालना व औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघांचा पुरता इस्कोट करून टाकला आहे. शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी तब्बल महिनाभर पक्षाला अक्षरशः वेठीस धरले. खैरे-दानवे यांना पाडायचे, अशा त्वेषाने पिछाडलेल्या आ.सत्तार यांना आपणच अलगद चकव्याच्या जाळ्यात फसत आहोत, याची जराशीही कल्पना आली नाही. मराठवाडी मातीत कसलेल्या या दोन्ही राजकीय पहिलवानांनी आता आघाडीचा पुरता इस्कोट करून टाकला आहे.

 औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर नजर टाकली तर गेल्या दोन महिन्यात घडलेल्या घटनांनी नफा आणि तोटा कुणाचा झाला याचा अंदाज येतो. गेल्या वीस वर्षांपासून भाजप-सेनेचे बालेकिल्‍लेे असलेले हे दोन मतदारसंघ यावेळी आघाडीसाठी अनुकूल होते. मोदींची लाट, दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश आणि स्थानिक खासदारांविरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर या आघाडीसाठी अत्यंत जमेच्या बाजू होत्या. असे असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदिलाने राहून उमेदवाराची निवड तातडीने करणे आवश्यक होते. या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी आ.अब्दुल सत्तार यांनी आपल्या शिरावर घेतली. तेच या दोन्ही मतदारसंघाचे सर्वेसर्वा होते. पक्षाचा कोणताच कार्यक्रम त्यांच्याशिवाय पार पडत नव्हता. असा टॉपचा नेता विरोधकांच्या जाळ्यात अलगद अडकत असेल तर आघाडीचे काहीही खरे नाही, असेच म्हणावे लागेल. आ. सत्तार यांनी खोतकर यांच्या बाणाने एकाच वेळी खैरे आणि दानवे यांचा वध करण्याचा प्रयत्न केला. आता तोच प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे.

दरम्यान, मुंबईच्या आदेशावरूनच राज्यमंत्री खोतकर यांनी पत्ते चालविले. आघाडीचा उमेदवार जाहीर होऊ नये म्हणून आ. सत्तार यांना झुलवत ठेवले, असे आता बोलले जाते. खोतकरांनी कुणाच्या सांगण्यावरून ही खेळी केली आहे हेही आता हळूहळू आता स्पष्ट होत आहे. खोतकर यांच्या नादात सत्तार ना जालन्याचा उमेदवार ठरवू शकले ना औरंगाबादचा! गेल्या दोन वर्षांपासून जोरदारपणे कामाला लागलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना हतबल करण्यात आ. सत्तार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना वेठीस धरले. आज खोतकर रावसाहेबांच्या मांडीला मांडी लावून आहेत. मात्र, आ. सत्तार काँग्रेसच्या नेत्यांसोबत नाहीत. खैरे -दानवेंना ‘चकवा’ देण्यास निघालेले सत्तार मुंबई आणि हैदराबादच्या नेत्यांशी संपर्कात आहेत, असे समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker